२३ लाखांची रक्कम घेऊन ड्रायव्हरचा पोबारा, textile merchants loot Rs. 23 lakhs

२३ लाखांची रक्कम घेऊन ड्रायव्हरचा पोबारा

 २३ लाखांची रक्कम घेऊन ड्रायव्हरचा पोबारा
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

नागपुरातील कापड व्यापारी पवनकुमार कुकरेजा यांची २३ लाखांची रक्कम घेऊन पोबारा करणा-या त्यांच्या ड्रायव्हरला पकडण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आलंय.

वसूलीची २३लाखांची रक्कम घेऊन पवनकुमार चंद्रपूरहून नागपूरला परतत होते.. चंद्रपूर शहराच्या सीमेवर त्यांची स्विफ्ट डिझायर गाडी आल्यावर पवनकुमार लघुशंकेसाठी गाडीखाली उतरले. यावेळी रक्कम असलेली सुटकेस गाडीतच होती. ही संधी साधून त्यांचा ड्राईव्हर शंकर डोंगरे याने मालक खाली उतरताच गाडी व रकमेसह पळ काढला.

पवनकुमार यांनी ताबडतोप चंद्रपूर शहरातील रामनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे कॉल डीटेल्स काढून त्याचा माग काढला. आरोपी शंकर याने चोरीची गाडी वणी येथील आपल्या एका नातेवाईकाकडे ठेवत पसार झाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान त्याचा मोबाईल गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे असल्याचे स्पष्ट होताच एका पथकाने तिरोडा गाठून त्याला संपूर्ण रकमेसह अटक केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, November 12, 2013, 15:29


comments powered by Disqus