Last Updated: Sunday, June 30, 2013, 21:24
www.24taas.com,झी मीडिया, नागपूरकुरियर कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करत घरात घुसलेल्या ३ भामट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटल्याचा खळबळजनक प्रकार नागपुरात घडला आहे.
शहरातील वर्मा-ले-आउट भागात राहणाऱ्या अय्यर परिवाराच्या घरावर दरोडा टाकताना दरोडेखोरांनी घरातील एका वृध्द महिलेच्या अंगावरील दागिने देखील लुटले. केंद्रीय निमलष्करी दलाच्या निवृत्त डीजीच्या घरावर हा दरोडा पडला असला, तरीही नागपुरातील हा एकमेव गंभीर स्वरूपाचा गुन्हा नाही. माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रावरून स्पष्ट होते कि गेल्या ३ वर्षात नागपुरात गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.
विशेष म्हणजे महिलांसंबंधी गुन्ह्यात विशेष वाढ याच काळात झाली आहे. त्यामुळे नागपुरात आता महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न सर्वसामान्य नागपूरकरांना पडला आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, June 30, 2013, 21:24