वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू Tiger kills woman

वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू

वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू
www.24taas.com, चंद्रपूर

चंद्रपूरच्या जंगलात सलग दुस-या दिवशी वाघानं हल्ला केलाय. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झालाय. सावली तालुक्यातल्या पाथरी जंगलात महिलेचा मृत्यू झालाय. ललिता पेंदाम असं या मृत महिलेचं नाव आहे.

गावालगतच्या जंगलात मोहफुले गोळा करण्यासाठी गेली होती. यावेळी बेसावध असलेल्या ललिता पेंदाम यांच्यावर वाघानं झडप घातली. त्यावेळी आरडाओरडा झाल्यानं आसपास काम करणा-या सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला होता. 24 तासांच्या आत चंद्रपूरच्या जंगलात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांची संख्या तीन झालीय. तर 15 दिवसांत 5 जणांचा बळी गेलाय.


वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू

साधारण १० दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ झाली असून त्यामुळेच जिल्ह्यातील जंगलात मोहफुले वेचणी आणि तेंदू पानं तोडणीच्या कामावर मोठ्या प्रमाणात जातात. वाघांच्या अधिवासाच्या भागात लोकांची गर्दी झाल्यानं हल्ल्याची शक्यता वाढलीय.

First Published: Thursday, April 11, 2013, 23:16


comments powered by Disqus