Last Updated: Saturday, October 6, 2012, 17:34
www.24taas.com,नागपूरनागपूरच्या मानेवाडा रोड वरी एका सराफा व्यापा-याची भर दिवसा गोळ्या मारून हत्या करण्यात आली. यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठवकर ज्वेलर्सचे मालक विजय ठवकर यांच्यावर अज्ञात मारेक-यांनी गोळ्या झाडल्या, तर त्यांच्या नोकरावर चाकूने हल्ला केला. डोक्याला गोळी लागल्याने विजय ठवकर यांचा घटना स्थळी मृत्यू झाला. तर नोकराला शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
ही घटना लुटीच्या उद्देशाने घडली की खुनाच्या, याचा आता तपास केला जातोय. मात्र मारेक-यांबद्दल पोलिसांना अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.
First Published: Saturday, October 6, 2012, 17:34