रेल्वेची दोन पट्टेदार वाघांना धडक!, train accident; one tiger dead another injured

रेल्वेची दोन पट्टेदार वाघांना धडक!

रेल्वेची दोन पट्टेदार वाघांना धडक!
www.24taas.com, चंद्रपूर

चंद्रपूरमध्ये दोन पट्टेदार वाघांना रेल्वेनं धडक दिलीय. केळझरजवळील चंद्रपूर - गोंदिया रेल्वे मार्गावर वनविभागाच्या प्रादेशिक वनांत चिचपल्ली कक्ष क्र. ४३८ मध्ये ही घटना घडली.

या अपघातात एका वाघाचा मृत्यू झालाय तर एक वाघ गंभीर जखमी झालाय. मृत्यूमुखी पडलेली वाघीण दीड वर्षीय वाघिणीचं पिल्लू होतं. डोक्याला जबर मार बसल्यानं या पिल्लाचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे अपघातात वाघच्या मृत्यूची ही पहिलीच घटना आहे. तर दुसऱ्या जखमी बछड्याला प्राथमिक उपचार करून नागपूरच्या सेमिनरी हिल्स वन शुश्रुषा वाटिकेत रवाना करण्यात आलं.

या जंगलात तीन बछडे आणि एका मादी वाघिणीचा वावर असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना नव्हती, हे विशेष. सोबतच या बछड्यांना तातडीनं उपचार करण्यासाठी वन विभागाकडे पुरेशी तयारीही नसल्याचं या घटनेनं सिद्ध केलं. हा अपघात घडलेल्या दोन्ही मादी आहेत. पाण्याच्या शोधार्थ ही बछडी रेल्वे रुळावर आल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवलाय.

First Published: Tuesday, April 16, 2013, 11:44


comments powered by Disqus