मानलेल्या मावशीने दिली दोघांना फाशी, Two Children Murder Case In Nagpur

मानलेल्या मावशीने दिली दोघांना फाशी

मानलेल्या मावशीने दिली दोघांना फाशी

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
मावशी म्हणजे आई प्रमाणेच मुलांवर प्रेम करणारी दुसरी आई असते. पण आपल्या बहिणींच्या मुलांना फाशी देण्याची घटना बल्लारपूर येथील शांतीनगर जाकीर हुसेन वॉर्डात घडली. प्रेम प्रकरण भाच्यांनी पकडून दिल्याचा राग ठेवून मानलेल्या मावशीने भाचा-भाचीला फासावर लटकवल्याची हृदयद्रावक आणि नात्याला काळिमा फासणारी घटना

सना अमान खान पठाण हे त्या क्रूरकर्मा मावशीचे नाव असून, इशफाक इस्माइल खान पठाण (१०) व महक इस्माइल खान पठाण (८) ही फाशी दिलेल्या मुलांची नावे आहे. घटनेच्या वेळी दोन्ही भावंड अंगणात खेळत होती. सना अमान खान पठाण (१९) हिने पहिले इशफाकला घरात नेऊन फेविक्वीकने त्याचे तोंड चिकटवले.

नंतर टीव्हीचा आवाज वाढवून त्याला फासावर लटकवले. भाऊ का बाहेर आला नाही म्हणून पाहायला गेलेल्या महकला सनाने आधी मोबाइल चार्जरने गळा घोटून मारण्याचा प्रयत्न केला. नंतर घरातील पाण्याच्या टाकीत ढकलून बुडवून मारले आणि निघून गेली. थोड्या वेळाने घरी आलेल्या इस्माइल खान पठाण यांना मुलगा फासावर लटकलेला पाहून धक्का बसला. त्यांनी त्याला खाली काढून दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अचानक मुलीचे लक्षात आल्याने ते धावतच घरी आले आणि त्यांनी शोधाशोध केली असता पाण्याच्या टाकीत तिचा मृतदेह तरंगत होता.

या घटनेची माहिती कळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शेजारील घरून सनाला बाहेर काढत बेदम मारले. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सनाला ताब्यात घेतले. पाठोपाठ संतप्त जमाव ठाण्यावर चालून आला. परिस्थिती पाहता घटनास्थळ, दवाखाना आणि पोलिस ठाण्यात बंदोबस्त लावण्यात आला आहे. सना ही अमान खान पठाण यांची शेजारी आहे. हे नाते रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असल्याने ती मुले सनाला मावशी म्हणायचे तसेच तीदेखील त्यांना भाच्यांप्रमाणे प्रेम द्यायची. परंतु, मध्यंतरी अमान खान पठाण यांनी सनाचे प्रेम प्रकरण उघड केल्यामुळे तिच्या मनात राग होता. त्यातूनच ही घटना घडली, अशी माहिती आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, September 14, 2013, 19:17


comments powered by Disqus