सरकारी लाचखोरीनं घेतला शेतकऱ्याचा जीव!, venality of govt officers, farmer suicide

सरकारी लाचखोरीनं घेतला शेतकऱ्याचा जीव!

सरकारी लाचखोरीनं घेतला शेतकऱ्याचा जीव!
www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात सरकारी बाबूंच्या लाचखोरीनं एका शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणली. विठोबा कृष्णाजी नागरकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. विठोबानं गळफास लावून आत्महत्या केलीय.

विठोबा नागरकर यांना जवाहर रोजगार योजनेअंतर्गत शेतात विहिर मंजूर झाली होती. बँकेतून कर्ज काढून त्यांनी ही विहीर बांधली. अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी त्यांनी अनेकदा सरकारी अधिकाऱ्यांकडे खेटे घातले. यावेळी पटवारी आणि पंचायत समितिमधील लिपिकांनी उघडपणे विठोबाकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली. दहा हजार रुपये देण्यास असमर्थ ठरलेल्या नागरकर यांना वारंवार विनंत्या करूनही आणि अनुदानासाठी पात्र असूनही डावलंल जात होतं.

या सरकारी छळाला वैतागून विठोबा यांनी स्वत:च्या शिवारातच गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्यापाठी दोन मुलं, दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 22, 2013, 12:30


comments powered by Disqus