व्हिडिओ पाहा : डोळ्यांदेखत वाघ शिकार करतो तेव्हा, watch video : Tiger hunting LIVE

व्हिडिओ पाहा : डोळ्यांदेखत वाघ शिकार करतो तेव्हा...

<B> <font color=red> व्हिडिओ पाहा :  </font></b> डोळ्यांदेखत वाघ शिकार करतो तेव्हा...
www.24taas.com, झी मीडिया, यवतमाळ

वाघ दिसताच भल्याभल्याची भंबेरी उडते.. हाच वाघ डोळ्यादेखत शिकार करताना दिसला तर काय अवस्था होत असेल याचा अनुभव यवतमाळ जिल्ह्यातल्या मोहम्मद आरिफला आलाय.

घोन्सा शिखला मार्गानं घरी परतत असताना पट्टेदार वाघाचं दर्शन त्याला घडलं आरिफला काही कळण्याआधीच त्या वाघानं म्हशींच्या कळपावर हल्ला करून वाघानं एका म्हशीच्या नरडीचा घोट घेतला. स्वतःला सावरत त्यानं वाघाची ही शिकार आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याद कैद केली. वाघ म्हशीला रस्त्यावरून फरफटत झुडपात नेत असतानाची दृश्यं आरिफनं त्याच्या कॅमेऱ्यात टिपलीत.

त्यानंतर या वाघाने आरिफ बसलेल्या वाहनाकडे नजर फिरवून रस्ता ओलांडला. सध्या या परिसरात याच पट्टेदार वाघाची दहशत पसरलीय. ग्रामस्थांना घराबाहेर पडणं कठीण झालंय. त्यामुळं या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होतेय.


व्हिडिओ पाहा :-




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 5, 2013, 11:40


comments powered by Disqus