Last Updated: Wednesday, April 10, 2013, 22:46
www.24taas.com, नागपूरनागपुरात पाण्याची नासाडी केली जातेय. नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेनं मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी केली.
नागपुरच्या रेशीमबाग मैदानावर या संघटनेनं बाईक रेसचं आयोजन केलं होतं. या रेससाठी मैदानात चिखल असावा म्हणून आयोजकांनी टँकरमधून चक्क 7 हजार लिटर पाणी मैदानावर ओतलं. महत्त्वाचं म्हणजे हा प्रकार घडला त्यावेळी एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, स्थानिक नेते समीर मेघे आणि अभिजीत वंजारी उपस्थित होते.
त्यामुळे या पाण्याच्या नासाडीला काँग्रेसचा पाठिंबा आहे का? असा प्रश्न विचारला जातोय. यासंदर्भात एनएसयुआयच्या नेत्यांनी बोलण्याचं टाळलंय.
First Published: Wednesday, April 10, 2013, 22:46