Last Updated: Wednesday, January 15, 2014, 15:46
www.24taas.com, झी मीडिया, आरमोरीदारूसाठी पत्नीने पैसे दिले नाहीत म्हणून पत्नीला जिवंत जाळल्याची घटना घडलीय. गडचिरोलीतल्या आरमोरीमध्ये ही घटना घडलीय.
ज्वाळांनी वेढलेल्या आईला तिचा दोन वर्षांचा मुलगा बिलगला आणि तोही यात होरपळलाय़. तो सध्या मृत्यूशी झुंज देतोय. पोलिसांनी पतीला अटक केलीय. आरमोरीमधे येरमे कुटुंब राहातात.
घरातला कर्ता पुरूष भाऊराव येरमे हा दारूच्या आहारी गेला होता. त्याने पत्नीजवळ दारूसाठी पैसे मागितले. त्याला पैसे देण्यास नकार दिल्यामुळे भांडण पेटलं. त्यातून हा प्रकार झाला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, January 15, 2014, 15:46