महिलांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावर मिर्गेंची माफी, women commission controversial statement on wom

महिलांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावर मिर्गेंची माफी

महिलांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावर मिर्गेंची माफी
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

महिला आयोगाच्या सदस्या आशा मिर्गे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला उद्देश नव्हता, जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करतोय, असं आशा मिर्गे यांनी म्हटलं आहे.

महिलांवर होणाऱ्या बलात्काराला महिलांचे कपडे देहबोली जबाबदार असते, असं वक्तव्य आशा मिर्गे यांनी केलं होतं, यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्यानंतर, आशा मिर्गे यांनी अखेर आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.

आशा मिर्गेचं वादग्रस्त वक्तव्य आणि सवाल
आशा मिर्गे यांना महिला सुरक्षा आणि बलात्कारावर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देतांना त्यांनी मुंबईतील शक्तीमील बलात्कार प्रकरण आणि दिल्लीतील निर्भया प्रकरणाची उदाहरणं दिली. मात्र महिला आयोग सदस्यांचीही उत्तर अजब वाटली.

मुंबईतील पीडित मुलीने शक्ती मिलमध्ये जाण्याची काय गरज होती. दिल्लीतील निर्भयाला मित्राबरोबर रात्रीच्या वेळेस चित्रपट पाहण्यासाठी जाण्याची गरज काय होती, असा सवाल करत अजब उत्तरं दिली.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो

First Published: Tuesday, January 28, 2014, 20:51


comments powered by Disqus