Last Updated: Friday, February 22, 2013, 13:17
www.24taas.com, नागपूर योगिता ठाकरे मृत्यूप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींच्या अडचणी पुन्हा वाढणार असं दिसतंय.
स्थानिक कोर्टानं सात वर्षांच्या योगिता ठाकरे मृत्यूप्रकरणाचा खटला बंद केला जावा म्हणून सीआयडीकडून दाखल करण्यात अहवाल फेटाळून लावलाय. २००९ साली भाजप नेते नितीन गडकरी यांच्या मालकीच्या गाडीत सात वर्षांच्या योगिताचा मृतदेह आढळून आला होता. योगिताचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं होतं.
हा खटला बंद करण्यात यावा, यासाठी सीआयडीनं एक रिपोर्ट दाखल केला होता. परंतू, हा रिपोर्ट फेटाळून लावत न्या. नीलिमा पाटील यांनी योगिताचे वडील दादासाहेब ठाकरे आणि प्रकरणातील इतर साक्षीदारांची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिलेत.
याआधीही, २०११ साली सीआयडीनं हा खटला बंद करण्याची मागणी केली होती त्यावेळी न्यायाधिशांनी त्यांची मागणी फेटाळली होती. महत्त्वाचं म्हणजे, एखाद्या खटल्यात पुरेसे पुरावे मिळत नसल्यास चौकशी यंत्रणेद्वारे खटला बंद करण्याची मागणी केली जाते.
First Published: Friday, February 22, 2013, 13:12