Last Updated: Wednesday, December 5, 2012, 16:28
www.24taas.com, नागपूरनागपुरात क्षुल्लक कारणावरुन एका युवकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. यामध्ये तरुण 80 टक्के भाजलाय. राजेश मोगरे असं या तरुणाचं नावं आहे. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलयं. या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हल्लेखोर फरार झाले आहेत.
राज्यात कालपासून गुन्हांचे प्रमाण प्रचंड वाढले आहेत. काल डोंबिवलीत तरूणाची हत्या करण्यात आली, तर लातूरमध्येही खून झाला आहे. तर आजही नागपूरमध्ये तरूणाला जिवंत जाळ्यात आलं आहे.
तर काल डोंबिवलीत भर रस्त्यात एका युवकाची हत्या करण्यात आलीय. तरूणीची छेड काढणाऱ्या रोड रोमिओंना जाब विचारणाऱ्या १९ वर्षीय संतोष विचीवोरा याच्यावर सोमवारी रात्री ९.३० च्या दरम्यान पाच जणांनी चाकूनं हल्ला केला. या घटनेत संतोषचा जागीच मृत्यू झालाय.
डोंबिवलीतल्या नवनीत नगरच्या गेटजवळ युवतींची छेड काढणाऱ्या रोड रोमिओंना संतोषने जाब विचारला होता. त्यामुळे चिडलेल्या रोड रोमिओंनी संतोषवर चाकूने जोरदार हल्ला केला.
First Published: Wednesday, December 5, 2012, 16:15