साईंच्या चरणी १ कोटी भाविक 1 crore pilgrimage at shirdi

साईंच्या चरणी १ कोटी भाविक

साईंच्या चरणी १ कोटी भाविक
www.24taas.com, झी मीडिया, शिर्डी

यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या दोन महिन्यात शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी तब्बल 1 कोटी भाविकांनी साई दरबारी हजेरी लावली. दररोज तब्बल 1 लाखांवर भाविक साईबाबांचं दर्शन घेतात.

साईभक्तांच्या संख्येमध्ये गेल्यावर्षीपेक्षा यंदा दीड लाखांनी वाढ झालीय. साई संस्थानच्या पी.आर.ओ.कार्यालयामार्फत व्हीआयपींना दिल्या जाणा-या पासेसद्वारे या दोन महिन्यात तब्बल 85 हजार भाविकांनी लाभ घेतलाय. गेल्या वर्षीपेक्षा हा आकडा दुप्पटीनं वाढलाय. साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात गेल्या एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येक दिवशी सरासरी 35 हजार भाविकांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतलाय. गेल्या दोन महिन्यातली आकडेवारी पाहता हा आकडा 24 लाखांवर गेलाय.

साई संस्थानकडून सकाळी विकल्या जाणा-या 6 लाख प्रसाद पाकिटांचा या वर्षी साईभक्तांनी लाभ घेतलाय. दोन महिन्यांत शिर्डीत तब्बल तीनशे कोटींची आर्थिक उलाढाल झालीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, June 5, 2013, 21:57


comments powered by Disqus