Last Updated: Monday, October 1, 2012, 19:30
www.24taas.com, धुळेधुळे शहरा पोलीस वसाहतीत राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून लाखो रुपयांचा विदेशी मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे.
आज सकाळच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली असुन सुमारे 300 विदेशी मद्याचे खोके जप्त करण्यात आलेत. या मद्यसाठ्याची किंमत 15 लाखापेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. पोलीस वसाहतीतच अशा प्रकारच्या गोष्टी उघडकीस येणं अतिशय संतापजनक आणि निंदनीय असल्याचं मत पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केल आहे.
दरम्यान ह्या प्रकरणातील दोषी पोलीस कर्मचा-यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.
First Published: Monday, October 1, 2012, 19:26