Last Updated: Thursday, April 25, 2013, 17:16
www.24taas.com, नाशिकमुलांना मारुन माता-पित्यानं आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय... मालेगावातल्या पवनवगर परिसरात राहणा-या कुटुंबाने हे कृत्य केलं आहे.
दाम्पत्यानं आधी आपल्या ३ मुली आणि एका मुलाची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर पतीपत्नीनं आत्महत्या केलीय. गरीबीला कंटाळून त्यांनी हे दुर्दैवी कृत्य केल्याचं समजतं आहे.
राज्यात असलेला भीषण दुष्काळ, शेतीचं सुरू असलेलं नुकसान.. यामुळे महाराष्ट्रात भीषण परिस्थिती आहे. आणि यामुळेच गरीबीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आणि गरीबीतून होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.
First Published: Thursday, April 25, 2013, 17:16