दहावीचा निरोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गाडीने उडविले, accident in Nashik & Parbhani

दहावीचा निरोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गाडीने उडविले

दहावीचा निरोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गाडीने उडविले
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

संकेत आणि मुज्जफर. शनिवारी सकाळी दहावीच्या निरोप समारंभसाठी आनंदात संकेत आणि मुझफ्फर निघाले. हसतखेळत जात असताना त्रिमूर्ती चौकात त्यांना एका मोपेडचा धक्का लागला. ट्रकखाली चिरडलं गेल्यानं दोघांचा दुर्दैवी अंत झाला. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलीस चौकी असूनही वाहतूक नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी कधीही पोलीस नसतात. दरम्यान, परभणीतील विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला.

महामार्गाचं चौपरीकरण झाल्यापासून शहरात येणाऱ्या वाहनांनी पाथर्डीपासून नाशकात येणाऱ्या या रस्त्याचा वापर करण्यास सुरुवात केलीय..त्यामुळं शहरातील महामार्गाकडील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढलाय.. महामार्गावर होणारे अपघात आता सर्विस रस्त्यावर होऊ लागले असून शाळकरी मुलांचे जीव जाण्याचे प्रमाण अधिकच वाढलंय. त्यामुळं शहरातील रस्त्यांच्या बाजूचे पार्किंग, हॉकर्स यांना पायबंद घालून रस्ते मोकळे करण्याची गरज आहे.

नाशिक पोलीस आणि महापालिकेनं राजकीय दबाव झुगारत रस्त्यांवर झालेली अतिक्रमणं बाजूला हटविण्याची गरज आहे. अन्यथा नाशिककरांचे असेच हकनाक बळी जात राहतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दरम्यान, परभणीत चार वाहनांचा विचित्र अपघात झालाय. या अपघातात एक जण ठार तर चौघे गंभीर जखमी झालेत. एका इंडिका गाडीचे टायर फुटून ती अॅपे रिक्षावर धडकून ऑटोचालक ठार झाला. तर हा प्रकार पाहण्याच्या नादात दुचाकीस्वारावर ट्रक घुसला. राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या पंधरावड्यात वेगवेगळ्या अपघातात आठ जणांचा बळी गेलाय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 23, 2014, 18:39


comments powered by Disqus