Last Updated: Saturday, July 27, 2013, 22:03
www.24taas.com, झी मीडिया, नाशिकनाशिकमध्ये आयटी क्षेत्राला चालना देण्यासाठी नाशिक आयटी डेस्टिनेशन या परिसंवादाच आयोजन करण्यात आलं होतं. देशातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरात नाशिकचा समवेश असला तरीही आयटीचे मोठे उद्योग येत नसल्याने उपस्थितांनी खंत व्यक्त केली. तर नाशिकसह महाराष्ट्र मार्केटिंगमध्ये कमी पडत असल्याच मत आयटी तज्ञ अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केलं केलं.
पर्यटन, वाईन उद्योग ही नाशिकची विशेष ओळख. सेकंड होमसाठीही नाशिकला पसंती मिळतेय. मात्र कितीही पाठपुरावा केला तरी नाशिकमध्ये आयटी क्षेत्र स्थिरावत नाही. मंत्र भूमीकडून यंत्रभूमी आणि आता यंत्र भूमीकडून तंत्र भूमीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक शहराची ओळख नेक्स्ट आयटी डेस्टिनेशन म्हणून करण्यासाठी एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात देशभरातील प्रमुख दीडशेहून अधिक आयटी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नाशिक शहरात आजमितीस ५० आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनी आहेत. त्यातून रोजगारही उपलब्ध होतोय. तरीही हा उद्योग इथे फोफावलाच नाही. एवढच काय नाशिकसह कोल्हापूर, औरंगाबादमध्येही म्हणावा तसा हा उद्योग स्थिरावला नाही. या शहरात आयटीला वाव आहे. कुशल मनुष्यबळ आहे. मात्र याचं योग्य मार्केटींग करण्यात सरकार अपयशी खंत आयटी तज्ज्ञ व्यक्त करतात.
गेल्या दहा बारा वर्षांपासून नाशिक औद्योगिक वसाहतीत आयटी सेंटर उभारण्यात आलंय. मात्र उदघाटनानंतर त्याचा वापर झालाच नाहीये. शहरात आयटी उद्योग काही प्रमाणात असला तरीही त्याला आवश्यक त्या सुविधा देण्याची मागणी करण्यात आलीय. तसंच आयटी क्षेत्रही राखीव करावं अशी मागणी करण्यात येते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, July 27, 2013, 22:03