नाशिक कुंभमेळ्याचा आराखडा वादात, action plan of nasik kumbhmela

नाशिक कुंभमेळ्याचा आराखडा वादात...

नाशिक कुंभमेळ्याचा आराखडा वादात...
www.24taas.com, नाशिक
नाशिक महापालिकेनं आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कृती आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आलाय. हा आराखडा वादात अडकलाय. यंदाच्या आराखड्यात मागच्या आराखड्यातूनच उचलेगिरी केल्याचा आरोप होतोय.

नाशिकमध्ये २०१५ साली होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी महापालिकेनं कृती आराखडा मंजुरीसाठी पाठवलाय. यामध्ये साधुग्राम बांधणं, शहराची स्वच्छता आणि आरोग्य विभागाला प्राधान्य देण्यात आलंय, अशी माहिती स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनी दिलीय. यंदाच्या कृती आराखड्यात गेल्यावेळच्या कुंभमेळ्यावेळी जो कृती आराखडा पाठवण्यात आला होता, त्यापेक्षा काहीच नवीन नसल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केलाय. फक्त दोन पुलांचा प्रस्ताव नवा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

गेल्यावेळच्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन अनेकांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शाही मार्ग आणि त्यावरच्या अतिक्रमणांविषयी महापालिकेनं भूमिका स्पष्ट केलेली नाही. नाशिककरांना आताच पाण्याची टंचाई जाणवतेय. लाखोंच्या संख्येनं भाविक नाशिकमध्ये येतील, त्यावेळचं काय, असे अनेक प्रश्न नाशिककरांनी उपस्थित केलेत.

First Published: Friday, September 7, 2012, 08:47


comments powered by Disqus