पिचड वादात, आदिवासींच्या जमिनी गडप, advasi`s land issue in nasik

आदिवासींच्या जमिनी गडप, पिचड वादात

आदिवासींच्या जमिनी गडप, पिचड वादात
www.24taas.com, नाशिक
नाशिक जिल्ह्यात आदिवासींची फसवणूक करण्यात आलीय. तत्कालीन आदिवासी विकास मंत्री आणि सध्याचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या कुटुंबीयांनीच ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. आदिवासींच्या जमिनी अतिशय कवडीमोल भावानं हडपल्याचा आरोप होतोय.

त्र्यंबकेश्वरपासून अवघ्या पाच ते सात किलोमीटर अंतरावर राहणारे हे रामा नावसु आणि गोविंद पारधी... दोघेही आदिवासी शेतकरी.. काचुरली गावात कधीकाळी यांच्याकडे १५ ते २० एकर जमिनी होत्या. आता त्याच शेतजमिनी त्यांच्या राहिलेल्या नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे मधुकर पिचड यांच्या कुटुंबियांनीच या जमिनी हडपल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी श्रमजीवी संघटनेनं अनेक विभागांकडे तक्रारी केल्यात. मात्र कुणीही दखल घेत नसल्याची माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष तुकाराम लचके यांनी दिलीय.

कोट्यावधी रुपयांच्या या शेतजमिनींचा पूर्ण मोबदलाही देण्यात आलेला नाही. कवडीमोल रक्कम देऊन त्यांची फसवणूक करण्यात आलीय.

First Published: Thursday, August 23, 2012, 08:56


comments powered by Disqus