शिवसेनेच्या `शिवबंधना`वर अजित पवार म्हणतात...Ajit Pawar target Shivsena and Udhhav Thackeray

शिवसेनेच्या `शिवबंधना`वर अजित पवार म्हणतात...

शिवसेनेच्या `शिवबंधना`वर अजित पवार म्हणतात...
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

शिवसेनेच्या शिवबंधन सोहळ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केलीय. गंडेदोरे बांधून कार्यकर्ते टिकत नाही. बाळासाहेब नसतानाही शिवसेनेला त्यांचा आवाज ऐकवण्याची वेळ का आली? असा सवाल अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना केलाय.

शिवसैनिकांना बंधन बांधण्याची वेळ का आली विचार करा, अशी टीका अजित पवारांनी केलीय. ते नाशिक इथं बोलत होते.

तसंच टोलबाबत लवकरच नवीन धोरण अवलंबणार असल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिलीय. टोल संस्कृती तत्कालीन शिवसेना-भाजप युतीनंच आणली, असा आरोपही अजित पवार यांनी केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 24, 2014, 13:27


comments powered by Disqus