Last Updated: Sunday, November 17, 2013, 22:30
www.24taas.com, झी मीडिया, अकलुज मर्सिडीज बेंझ गाडीलाही अकलूजच्या घोडेबाजारानं मागं टाकलंय. या घोडेबाजारात एक ४० लाखांचा घोडा दाखल झालाय. या घोड्याला पाहण्यासाठी राज्यातले नाही तर देशातले प्राणी प्रेमी दाखल झालेत.
अकलूजच्या घोडेबाजारातला हा वजीर.. अतिशय रुबाबदार असा हा वजीर १५ महिन्यांचा आहे.. अतिशय सुंदर नर्तन हा घोडा करू शकतो. याची किंमत आहे तब्बल ४० लाख... व्यापाऱ्यांनी २५ लाखात याची मागणी केल्यामुळं त्याची विक्रीच झाली नाही. तैफीक अहमद हा बरेलीचा घोडेमालक त्याला इथं घेऊन आलाय.
अकलूजच्या बाजारात या घोड्यासाठी २५ लाखांची किंमत द्यायला व्यापारी तयार होते. मात्र आपला घोडा ४० लाखात विकला जाणार याबद्दल तौफीक यांना खात्री आहे. अकलूजच्या या घोडेबाजारातून सबंध देशातून घोडे येतात. यंदा या बाजारात १० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Sunday, November 17, 2013, 20:10