पवन पवार यांना न्यायालयीन कोठडी Arrest to Pawan Pawar

पवन पवार यांना न्यायालयीन कोठडी

पवन पवार यांना न्यायालयीन कोठडी
www.24taas.com, नाशिक

नाशिकरोड प्रभाग सभापती पवन पवार यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अपक्ष नगरसेवक आणि सभापती पवार यांच्यासह पाच जनावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात खंडणीच्या गुन्हा दाखल करण्यात आलाय.

विशेष म्हणजे कालच्याच दिवशी उपनगर पोलिसठाण्यात पवन पवार विरोधात रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दमबाजी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोडचे मालवाहतूकदार दीपक भाटिया यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरमहा पवन पवार सभापती झाल्या नंतर सहा महिन्यापासून दरमहा एक लाख रुपयाची खंडणी मागण्यासाठी पवनच भाऊ विशाल आणि इतर साथीदार दमबाजी करत असल्याच्या फिर्यादीवरून ही करावी करण्यात आली. तर उपनगरचा गुन्हा एअरफोर्समध्ये काम करणाऱ्या विलास बाबुराव हंडोरे यांचे पत्नी संगीताशी न्यायालयात कौटुंबिक वाद सुरु आहे.

कोर्टाच्या आदेशानुसार हंडोरे मुलगा वेदांतला भेटण्यासाठी गेले असता पवन पवार,संगीताचा भाऊ संदीप पाटील आणि इतर साथीदारांनी रिव्हॉल्व्हरचा धक दाखवत दमबाजी आणि शिवीगाळ केल्याचं आरोप ठेवण्यात आलाय.

First Published: Tuesday, February 26, 2013, 21:04


comments powered by Disqus