Last Updated: Thursday, February 13, 2014, 23:04
www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबईधुळे जिल्हा कारागृहातील एका अट्टल गुन्हेगाराने संशयित आरोपी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन यांच्यावर हल्ला केला.
दोंडाईचामधील योगेश धनगर खून प्रकरणी महाजन हे धुळे कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
कारागृहातील रुग्णालय यार्डातील बॅरेक क्रमांक एकमध्ये मनोहर पाटील याने धारधार वस्तूने त्यांच्या डोक्यावर हल्ला केला.
तसंच बॅरेकमधील माठ महाजन यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात प्रकाश महाजन यांना डोक्याला गंभीर दुखापत झालीय.
कारागृहात कैदी म्हणून असलेल्या मनोरुग्ण मुलांवर काही गुन्हेगारांकडून अनैसर्गिक कृत्य करण्यात येतं. तसंच कारागृहात गैरकारभार चालतो. याप्रकरणी आपण कारागृह प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही.
तसंच या तक्रारीमुळे आपल्यावर जीवघेणा हल्ला होण्याची शक्यता असल्याचं कारागृह प्रशासनाला सांगितलं होतं. मात्र कारागृहातील तुरुंग अधिका-यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानच हल्ला झाल्याचा आरोप महाजन यांनी केलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, February 13, 2014, 23:04