बबनराव वैतागले आपल्याच पक्षाच्या खात्यावर! Babanrao Pachpute on department

बबनराव वैतागले आपल्याच पक्षाच्या खात्यावर!

बबनराव वैतागले आपल्याच पक्षाच्या खात्यावर!
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मनमानीला वैतागून आदिवासी विकास विभागानं स्वतंत्र बांधकाम विभाग सुरु करण्याचं ठरवलंय. आपल्याच पक्षाच्या खात्याच्या कारभारावर आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते का वैतागलेत आणि ही घोषणा नेमकी त्यांनी का केली?

आदिवासी गावांसाठी बांधावयाच्या रस्त्यांसाठीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभाग चक्क दुस-याच कामासाठी वापरत असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यातच वापरलेल्या पैशांचा हिशोबही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळत नसल्याची आदिवासी मंत्र्यांची तक्रार आहे. त्यामुळेच आदिवासी विभागासाठी स्वतंत्र बांधकाम विभाग तयार करण्याची त्यांची मागणी आहे.

आदिवासी विकास मंत्र्यांनी आपल्याच पक्षाकडे असलेल्या या खात्याच्या नेतृत्वाची आब तर राखली. मात्र बुंद से गयी वो हौदसे नही आती असे म्हटले तर वावगे होणार नाही...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, May 12, 2013, 18:46


comments powered by Disqus