Last Updated: Monday, October 15, 2012, 22:02
मुकुल कुलकर्णी, www.24taas.com, नाशिकमेडिकल दुकानांनी संप मागे घेतला असला, तरी येत्या काही दिवसांत सर्वसामान्य़ांना अनेक संप आणि बंदला सामोरं जावं लागणार अशी चिन्हं आहेत. पेट्रोलपंपधारकांबरोबरच एसटी आणि पोस्टातल्या कर्मचा-य़ांनीही संपाचा इशारा दिलाय.
पेट्रोल पंपधारकांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जात असतानाच, विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. एसटी कामगार संघटनेनंही पगारवाढीसह कामगार कराराच्या मुद्द्यावर कोणत्याही क्षणी चक्काजाम कऱण्याचा इशारा दिलाय.
हे सगळं कमी की काय, म्हणून ग्रामीण डाक सेवेच्या पदाधिका-यांनीही आंदोलनाचा इशारा दिलाय. हे सगळे संप आणि आंदोलनांमध्ये भरडला जाणार आहे, तो सर्वसामान्य नागरिक. नाशिकमध्ये बीएसएनएलच्या अधिकारी आणि कर्मचारी संघटनेनंही आंदोलन केलं. बीएसएनएलमधल्या ITS अधिका-यांना प्रतिनियुक्तीवरुन मूळ सेवेत सामावून घ्यावं, या मागणीसाठी देशभर आंदोलन करण्यात आलं. या सगळ्या संप आणि बंदमध्ये हाल होणार आहेत ते सामान्य माणसाचे.
First Published: Monday, October 15, 2012, 22:02