Last Updated: Saturday, March 29, 2014, 18:54
www.24taas.com, झी मीडिया, धुळेधुळे जिल्ह्यातील भाडणे फाट्याजवळ बिअरच्या बाटल्यांची वाहतूक करणारा ट्रक उलटला. यानंतर अपघातग्रस्त ट्रकमधून बियरच्या बाटल्या लुटण्यासाठी ग्रामस्थांची एकच झुंबड उडाली.
हा ट्रक किंग फिशर कंपनीचा बिअरचा साठा घेऊन औरंगाबादहून नंदुरबारकडे जात होता. मात्र नंदुरबार मार्गावर भाडणे फाट्याजवळ हा ट्रक उलटला आणि मद्याच्या बाटल्या सर्व रस्त्यांवर पसरल्या होत्या.
बिअरच्या बाटल्या भरलेला ट्रक उलटल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली, आणि ग्रामस्थांनी ट्रककडे धाव घेतली आणि जास्तच जास्त बाटल्या जमवून धूम ठोकली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, March 29, 2014, 18:54