छगन भुजबळांचा नरेंद्र मोदींना टोला Bhujbal on Narendra Modi

छगन भुजबळांचा नरेंद्र मोदींना टोला

छगन भुजबळांचा नरेंद्र मोदींना टोला
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

उत्तराखंडमध्ये जाऊन नरेंद्र मोदींनी पीडितांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावर सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.

या नैसर्गिक आपत्तीत सुरक्षायंत्रणा आपलं काम करत असताना तिथे कोणत्याही नेत्याने जाण्याची गरज नाही असं वक्तव्य भुजबळ यांनी केलंय. आपत्ती निर्मुलनासाठी हुशार अधिकारी वर्गाची गरज आहे. मंत्री दौऱ्यावर गेल्याने तिथे बचावकार्यात अडथळा येऊ शकतो असं भुजबळ म्हणाले.

मात्र मोदींवर निशाणा साधतानाच भुजबळांनी आपल्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची पाठ थोपटली. नाशिक जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांनी सर्वात आधी पावलं उचलली असं ते म्हणाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, June 23, 2013, 17:59


comments powered by Disqus