मी `ओबीसी` असल्यामुळे...- छगन भुजबळ Bhujbal talks about his cast

मी `ओबीसी` असल्यामुळे...- छगन भुजबळ

मी `ओबीसी` असल्यामुळे...- छगन भुजबळ
www.24taas.com, नाशिक

निवडणुकींच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या व्होटबँकेचे पत्ते टाकायला सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी मुस्लिमांना विश्वासाची गरज असल्याचं सांगत राष्ट्रवादीचं मुस्लिम कार्ड उघडं केलं होतं, तर आज छगन भुजबळ यांनी आपल्या जातीचा हवाला देत आपण ओबीसी असल्यामुळे आपल्याला त्रास दिला जात असल्याचं विधान केलं आहे.

मी ओबीसी असल्यामुळे हेतूपुरस्सर मला टार्गेट करण्यात येत असल्याची टीका सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळांनी केली. गेल्या ६ महिन्यांपासून त्यांच्यावर सातत्यानं आरोप होत असल्यामुळे त्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी हे विधान केलं.

भाजपाचे किरीट सोमय्या यांनी तर भुजबळांना कोर्टात खेचलं. तर पक्षांतर्गत विरोधकही त्यांना लक्ष्य बनवत असल्याचं वारंवार समोर आलंय. या सर्वांमागे जातीयवाद असल्याचा दावा आज भुजबळ यांनी केला. नाशिकमध्ये दादासाहेब सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या माळी समाजाच्या अधिवेशनात त्यांनी आपली बाजू मांडली.

First Published: Sunday, November 4, 2012, 22:32


comments powered by Disqus