महापौरांची वाढवलेल्या बोनसला पुन्हा कात्री!, Bonus reduced

महापौरांची वाढवलेल्या बोनसला पुन्हा कात्री!

महापौरांची वाढवलेल्या बोनसला पुन्हा कात्री!
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

नाशिक महापालिकेत नक्की मनसेचं राज्य आहे की आयुक्तांचं असा प्रश्न उपस्थित झालाय. महापौरांनी वाढविलेल्या बोनसला पुन्हा एकदा आयुक्तांनी कात्री लावलीय.

त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर कर्मचारी नाराज तर झालेच आहेत पण महापौरांच्या निर्णयालाही केराची टोपली दाखवलीय. १५ दिवसांपूर्वी प्रशासनानं कर्मचा-यांना ११ हजार १११ रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची घोषणा केली. गेल्या वर्षीपेक्षा हा बोनस कमी असल्यानं कामगार संघटनांनी दबाव वाढवला. त्यानंतर चार दिवसांपूर्वी महापौरांनी बोनसमध्ये २ हजारांची वाढ करत १३ हजार १११ बोनस देण्याचं जाहीर केलं.

ह्या निर्णयाच स्वागत होत असतानाच आयुक्तांनी आज महापौरांच्या निर्णयालाच आव्हान देत ११ हजार १११ रुपयांचा बोनस देण्याचं परिपत्रक काढलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 30, 2013, 22:36


comments powered by Disqus