Last Updated: Tuesday, January 14, 2014, 14:28
www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगरमहिला व बालविकास विभागात होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ भीक मागो आंदोनल करण्यात आलंय. संपूर्ण शहरात प्रभात फेरी काढून भीक मागण्यात आली आणि ती भीक महिला व बालकल्याण विभागातील अधिका-यांना लाच म्हणून देण्यात आली.
अहमदनगर इथं स्वयंसेवी संस्थांच्यावतीनं हे आनोख आंदोनल करण्यात आलं. विभागात अनाथ बालकांसाठी अपुरे अनुदान मिळत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच महिला व बालविकास अधिकारी चंद्रशेखर पगारे यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आलीय.
महिला व बालविकास विभागात होत असलेला भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आणि अनाथ बालकांसाठी मिळणारे अपुरे अनुदान, अपुरे वेतन यांसारख्या विविध मागण्यांसाठी अहमदनगर स्वयंसेवी संघटनांच्यावतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. संपूर्ण शहरात प्रभात फेरी काढून भिक मागून ती भिक महिला व बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांना लाच स्वरुपात देऊन या संघटनांनी आपला निषेध व्यक्त केला.
अहमदनगर जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागात मोठ्या प्रमाणावर लाच घेऊन भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत महिला व बालविकास अधिकारी चंद्रशेखर पगारे यांना तातडीने निलंबित करावे या मागण्यांसाठी स्वयंसेवी संस्थांच्यावतीने अहमदनगरमध्ये एक आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. चंद्रशेखर पगारे यांच्या विरुद्ध विविध संस्था चालकांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप प्रतिज्ञा पत्राद्वारे केले आहेत. त्यामुळे त्यांचे त्वरित निलंबन करून त्यांच्यावर उचित कठोर कारवाई शासनाने करावी, अशी मागणी यावेळी स्वयंसेवी संस्थांच्यावतीने करण्यात आली. एवढेच नाही तर संस्थांना दरमहा जे ९५० रुपये मिळणाऱ्या अनुदानात वाढ होऊन ते ३००० रुपयांपर्यंत देण्यात यावे, तसेच अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन लागू करावे आणि अनाथ मुले राहत असलेल्या इमारतींचे ७५ टक्के भाडे देण्यात यावे अशा मागण्यांसाठी हे अद्नोलन केले.
दरम्यान या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखल घेतली असून शासनाकडे देखील या आंदोलनाची माहिती दिली असल्याची माहिती प्रभारी महिला व बालविकास अधिकारी विजय तावरे यांनी दिली आहे. या संस्था चालकांनी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांना भेटून आपल्या मागण्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची माहिती दिली. आण्णा हजारे यांनी देखील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्राद्वारे कळवले आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 14, 2014, 11:30