Last Updated: Friday, February 15, 2013, 10:04
www.24taas.com, नाशिक शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल आणि समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश सोहळा नाशिकमध्ये पार पडला. यावेळी भुजबळांनी शिवसेना आणि मनसेवर जोरदार हल्लाबोल केला.
`शिवसेना फक्त जय महाराष्ट्र करते पण महाराष्ट्राचा जय होण्यासाठी काहीच करत नाही... मातोश्रीचे फोन लागत नाहीत. शिवसेनेची कार्यपद्धती रस्त्यावरील फोन सारखी झालीय... पैसे टाकले की मातोश्रीचा फोन लागतो अन्यथा लागत नाही’, असा जोरदार टोला छगन भुजबळ यांनी शिवसेनेला लगावलाय. सोबतच ‘ इथं बिनपैशाच फोन करा, बिनपैशाचा तो उचलला जाईल’ असं म्हणत एका माजी शिवसैनिकानं दुसऱ्या एका माजी शिवसैनिकाचं राष्ट्रवादीत स्वागत केलंय.
सुनील बागुल यांनी मागील महिन्यात शिवसेनेच्या विद्यमान जिल्हाप्रमुखांवर टीका केली होती तसंच त्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. त्यानंतर शिवसेनेनं बागुल यांची हकालपट्टी केली होती.
First Published: Friday, February 15, 2013, 09:55