Last Updated: Tuesday, October 23, 2012, 16:54
www.24taas.com, नाशिकगोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या 11 बंधा-यांच्या कामात पैशाचा मोठा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीवरून राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव, अर्थ खात्याच्या प्रधान सचिवासह 26 अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशानंतर सोमवारी रात्री उशीरा गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
औरंगाबादच्या जवाहर नगर पोलिस ठाण्यात या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.. यामध्ये गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळातील कार्यकारी अभियंत्यापासून कनिष्ठ अभियंत्यापर्यंत अनेक अधिका-यांचा समावेश आहे. मराठवाड्यात गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या 11 बंधाऱ्यांच्या कामात मोठा घोटाळा उघड झाल्याची पोलखोल झी 24 तासने केली होती.
याप्रकरणी भाजपचे माजी आमदार बबनराव लोणीकर यांनी कोर्टातही धाव घेतली होती त्यानुसार अखेर आता या घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत...
First Published: Tuesday, October 23, 2012, 12:44