Last Updated: Thursday, May 30, 2013, 20:59
www.24taas.com, झी मीडिया, नाशिकनाशिक महानगर पालिकेच्या स्थायी समितीत घंटागाडीचा वादग्रस्त ठेका सात दिवसांसाठी तहकूब ठेवण्यात आलाय. नाशिक शहरातल्या घंटागाडीच्या ठेक्याला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीनं ठेवण्यात आला.
मात्र एक वर्षाची मंजुरी असताना देखील दोन वर्षासाठी आणि सहा कोटी रुपयांचा ठेका बारा कोटी रुपयांपर्यंत नेण्याची किमया प्रशासनाने केली होती. यावर विरोधकांनी आक्षेप घेत एकूणच आर्थिक बाबींवर प्रशासनाला धारेवर धरले.
अखेरीस अटी शर्थी बघून पुढच्या सभेत निर्णय घेण्याचा दावा सभापतींनी केलाय. तर आता आठ दिवसांनंतर नाशिककरांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाचा निकाल हे लोकप्रतिनिधी कसा लावतात याकडे नाशिककरांचं लक्ष आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, May 30, 2013, 20:59