Last Updated: Tuesday, June 11, 2013, 19:44
www.24taas.com, झी मीडिया, शिर्डीआंध्रप्रदेशातील हैंद्राबाद येथील साईभक्त आणि एस.व्ही.आर.या प्रवासी कंपनीचे मालक सुभाषचंद्र यानी आज शिर्डीच्या साईबाबांना ७०० ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे.
गेल्या २० वर्षापासून हैद्राबाद ते शिर्डी अशी प्रवाशी बस सेवा देणारे आणि आंध्रप्रेदशातील एस.व्ही.आर.यात्रा कंपनीचे मालक सुभाषचंद्र बस यांनी आज दुपारच्या मध्यान्ह आरतीला हा मुकुट साई चरणी अर्पण केला. सुबक नक्षीकाम असलेल्या या मुकुटाची आजच्या बाजारभावानुसार किमत २३ लाख रुपये इतकी आहे. मध्यान्ह आरतीपूर्वी हा सुवर्ण मुकुट साईच्या मुर्तीला घालण्यात आला होता. उपस्थित भाविकांनी साईंचा जयकार करत आनंद व्यक्त केला.
गेल्याच आठवड्यात आंध्रप्रदेशातील एका साईभक्ताने हिरे जडीत असा ३० लाखाचा सुवर्ण हार साईंना अर्पण केला होता. सोन्या चांदीचे बाजरभाव कितीही वाढोत मात्र साईंच्या चरणी सुवर्ण आणि चांदीच्या वस्तू देण्याचे परंपरा अखंडीत सुरु आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, June 11, 2013, 18:25