Last Updated: Tuesday, December 31, 2013, 17:36
www.24taas.com, झी मीडिया, धुळेधुळ्याच्या महापालिका निवडणुकीनंतर लोकशाहीची थट्टा पाहायला मिळालीये. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पैशांची शब्दशः उधळपट्टी केलीये... नवनिर्वाचित उपमहापौर फारुख शहा यांच्या मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी हा पैशांचा माज दाखवला...
त्यांच्या देखतच १०-१० रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटा उधळण्यात आल्या. मिरवणुकीत त्यांचे दोन कार्यकर्ते सर्रास नोटांची उधळण करत होते. आश्चर्य म्हणजे त्यांना कोणीही थांबवलं नाही. विशेष म्हणजे पैशांची ही उधळण महापलिकेलगतच्या राणी लक्ष्मीबाई चौकात केली जात होती. पत्रकारांनी ही बाब टिपल्यानंतर उपमहापौरांनी कार्यकर्त्यांना रोखलं... मात्र मिरवणूकीत बराच वेळ हा प्रकार सुरू होता...
काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीचे जळगावचे आमदार संजय सावकारे यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांनी असाच नोटांचा पाऊस पाडला होता... आता पुन्हा धुळ्यामध्ये हाच प्रकार घडलाय...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Tuesday, December 31, 2013, 17:36