पोलिसाला मारहाण करणारा नगरसेवकाचा मुलगा अटकेत, Dhule police beaten arrest on corporeter son

पोलिसाला मारहाण करणारा नगरसेवकाचा मुलगा अटकेत

पोलिसाला मारहाण करणारा नगरसेवकाचा मुलगा अटकेत
www.24taas.com, धुळे

धुळे शहरातील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विशेष पोलिस पथकानं फरार असलेले प्रमुख आरोपी देवा सोनारसह इतर चार जणांना अटक केली आहे.

गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने मालेगावमध्ये ही कारवाई केलीय. देवा सोनार हा राष्ट्रवादीचे नगरसवेक चंद्रकांत सोनार यांचा मुलगा आहे. धुळवड खेळताना दोन गटात झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या एपीआय धनंजय पाटील यांच्यावर देवा सोनार सह त्याच्या इतर सहकार्यांनी तलवारीनं प्राणघातक हल्ला केला होता.

धनंजय पाटील हे गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर देवा सोनारसह त्याचे सहकारी फरार झाले होते. याप्रकरणी देवा सोनार सह इतर ११ जनावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नगरसेवक चंद्रकांत सोनार य़ांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published: Friday, March 29, 2013, 23:39


comments powered by Disqus