डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी संशयित ताब्यात! Dr. Dabholkar Murder case one suspect is under control in Shirdi police

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी संशयित ताब्यात!

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी संशयित ताब्यात!
www.24taas.com , झी मीडिया, शिर्डी

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी जारी केलेल्या दुसऱ्या रेखाचित्राशी मिळता-जुळता चेहरा असलेल्या असिफ नावाच्या एका इसमास शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांनी साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक- ४ समोरुन ताब्यात घेतलंय.

शिर्डी पोलिसांनी आरोपीला काल अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधिक्षक रावसाहेब शिंदे यांच्यासमोर हजर केलं. आता या आरोपीला अहमदनगर पोलिसांनी पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलंय.
असिफ हा २८ वर्षीय तरुण असून तो कर्नाटक राज्यातल्या फिरदासनगर जि. कप्पल इथला रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातच अहमदनगर पोलिसांनी श्रीरामपूर शहरातूनही आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येतेय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, September 5, 2013, 13:11


comments powered by Disqus