नाशिक, धुळे येथे भूकंपाचे धक्के, earthquakes In Nashik & Dhule

नाशिक, धुळे येथे भूकंपाचे धक्के

नाशिक,  धुळे येथे भूकंपाचे धक्के
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

नाशिक जिल्ह्यात सायंकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. कळवण, पाळे, दळवट परिसरात ५ ते ७ सेकंद भूकंपाचे धक्के बसलेत. तर धुळ्यामध्येही सौम्य धक्का जाणवला.

नाशिकबरोबच धुळे जिल्ह्यातही सायंकाळी ७.३० वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला. कळवण तालुक्याच्या शेजारीच असलेल्या साक्री तालुक्यासह वार्सा, बारीपाडा, मांजरी परिसरात सौम्य प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले.

या भूंकपात कोणतीही वित्तहानी अथवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील हा परिसर भूंकपप्रवर्ण असल्याने येथे वारंवार भूंकपाचे धक्के जाणवतात. मात्र भूकंपाचे धक्के बराच काळ जाणवल्याने येथील नागरिकांमध्ये एकाच घबराट उडाली होती.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 7, 2014, 23:41


comments powered by Disqus