Last Updated: Tuesday, April 23, 2013, 21:17
www.24taas.com, नाशिकनाशिकच्या रजनीगंधा हॉटेलमध्ये विष प्राशन करुन प्रेमी युगलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय..
नांदेडच्या तरुणाची नाशिकच्या महाविद्यालयात होम सायन्सचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीशी फेसबुकच्या माध्यमातून प्रेम संबंध जुळले, मात्र लग्न होण्याची शाश्वती नसल्याने दोघांनी आपली जीवन यात्रा संपविली.
मृत्यूआधी त्यांनी एक चिठी लिहून ठेवली त्यात समाजामुळे आपण लग्न करू शकत नसल्याचं त्यात नमूद करण्यात आलं असून आपलूया मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये अस दोघानीही लिहून ठेवलाय.
काल रात्री त्यांनी हॉटेल मध्ये जेवण मागविल होत. सकाळी कुठलीच हालचाल नसल्याने दुपारी मास्टर चवीने रूम उघडली असता दोघ मृत असल्याचं समोर आलं.
First Published: Tuesday, April 23, 2013, 21:17