सामान्य शेतकऱ्याची मुलगी झाली पायलट, farmer`s Daughter pilots in Yavala

येवल्यातील सामान्य शेतकऱ्याची मुलगी झाली पायलट

येवल्यातील सामान्य शेतकऱ्याची मुलगी झाली पायलट
www.24taas.com, झी मीडिया, यवला

जिद्द असेल तर कितीही बिकट परिस्थितीवर मात करुन आकाशाला गवसणी घालता येते हे नाशिक जिल्ह्यातल्या निर्मला खळेनं दाखवून दिलंय. घरच्या अडचणीवर मात करुन ही ग्रामीण भागातली सामान्य शेतकऱ्याची मुलगी आज पायलट झालीय. तिच्या या आकाश भरारीचा पाहू या या स्पशेल रिपोर्ट.

चार हजार लोकसंख्येचे निमगाव मढ गावात शेतक-याच्या कुटुंबात जन्मलेल्या निर्मला खळेचं स्वप्न होतं काहीतरी वेगळं करण्याचं. प्राथमिक शिक्षण गावातल्या जिल्हा परिषद शाळेतचं झालं. परिस्थितीशी झगडत तिनं मुक्त विद्यापीठातून बी.ए.ची पदवी घेतली. पण निर्मलाचं एवढ्यावरचं समाधान होणार नव्हतं.आई वडिलांकडे लहानपणी खेळणीतले विमान मागणा-या निर्मलाला पायलट व्हायचे होते.

मात्र यासाठी आवश्यक असणारी २८ लाखांची फी भरण्याची ऐपत तिच्या कुटुंबियांची नव्हती.परंतु निर्मला आणि तिच्या कुटुंबियांच्य़ा प्रयत्नांना गावक-यांचं पाठबळ मिळालं. स्थानिक नेत्यांच्या पाठबळामुळे २७ लाख २९ हजारांची शिष्यवृत्ती निर्मलाला मंजूर झाली.

गावकऱ्यांचे पाठबळ आणि पालकमंत्री छगन भुजबळांची साथ यामुळे निर्मलानं हैदराबादच्या राजीव गांधी विंग्ज एव्हिएशनमध्ये पायलटच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. जिद्द असेल तर कितीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते हेच निर्मलानं दाखवून दिलंय.

पायलटचं प्रशिक्षण पूर्ण करुन आकाशी मुक्त विहार करण्यासाठी निर्मला आता सज्ज झालीय. मात्र अजूनही तिचे पाय जमीनीवर आहेत. आजही घरातली सारी कामं ती पार पाडतीय.

कष्टकरी शेतकऱ्याची मुलगी ते पायलट निर्मलाचा हा सारा प्रवास यशाची नवी शिखरं सर करणारा आहे. त्याचबरोबर मनात जिद्द असेल तर आकाशालाही गवसणी घालता येते अशी स्फूर्ती तिच्या या प्रवासावरुन इतरांनीही घ्यायला हवी.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 18, 2013, 19:54


comments powered by Disqus