शेतकऱ्यांना चक्क पोलिसांच्या गाड्यांमध्ये कोंबल, farmers opposed to the Indiabulls private railway route

शेतकऱ्यांना चक्क पोलिसांच्या गाड्यांमध्ये कोंबल

शेतकऱ्यांना चक्क पोलिसांच्या गाड्यांमध्ये कोंबल
www.24taas.com,झी मीडीया, नाशिक

नाशिक जिल्ह्यात सिन्नरमध्ये इंडियाबुल्सच्या खासगी रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला विरोध करणा-या शेतकऱ्यांवर सरकारी यंत्रणांचा आसूड पडतोय. तिथं बळजबरीनं जमीन मोजणीचं काम सुरू आहे. विरोध करणा-या शेतक-यांना चक्क पोलिसांच्या गाड्यांमध्ये भरलं जातंय.

इंडियाबुल्सच्या दिमतीला प्रशासनानं पोलिसांचा बराच मोठा फौजफाटा दिलाय. वयाचा विचार न करता वृद्ध महिलांवरही बळाचा वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार झी २४ तासच्या कॅमे-यात कैद झालाय.

दरम्यान, या प्रकाराबाबत ‘झी २४ तास’नं जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे आरोप फेटाळून लावलेत. तसंच केवळ काही चार पाच कुटुंबच आडमुठेपणा करत असल्याचा दावा त्यांनी केलाय.

First Published: Thursday, April 25, 2013, 18:57


comments powered by Disqus