farming in nashik-24taas.com

शेतकऱ्यांनं बनवलेल्या पेरणी यंत्राची करामत!

शेतकऱ्यांनं बनवलेल्या पेरणी यंत्राची करामत!
www.24taas.com, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातल्या अंदरसूलच्या ज्ञानेश्वर जाधव यांनी उपयुक्त असं खत पेरणी यंत्र तयार केलंय. मका, कपाशीसारख्या पिकांना याचा मोठा फायदा होतो.या यंत्रामुळे महागड्य़ा खतांची बचत तर होतेच तसेच कमी खर्चात खत देण्यामुळे शेतकऱ्याचं हे जिकारीचं काम अत्यंत सोप झालंय.

अंदरसूल इथल्या ज्ञानेश्वर जाधव यांनी विकसीत केलेलं हेच ते पेरणी यंत्र. या पेरणी यंत्राने मोठी कामगिरी केलीय. अल्पभूधारक शेतक-यांसाठी तर हे वरदानचं ठरलंय. कारण पिकांची लागवड केल्यानंतर सिंचनानंतर खत देण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मजूरांच्य़ा टंचाईमुळे खत देण्यासाठी मजुरांची मर्जी आणि वाढणार खर्च बेभान झाल्याने जाधव यांनी ही युक्त सुचली आणि ती त्यांनी मोठ्या कौशल्यानं प्रत्यक्षात आणली.

गेल्या वर्षी ज्ञानेश्वर जाधव यांनी कृषी प्रदर्शनामध्ये राजकोट इथल्या मक्याचं पेरणी यंत्र बघितलं त्यांना ते आवडल्यानं त्यांनी ते विकत घेतलं आजूबाजूच्या शेतक-यांनीही त्याची मागणी केली मात्र या यंत्रामुळे मक्याची पेरणी यशस्वी झाली नाही.त्यामुळे घऱातच १० यंत्रे पडून राहिली. पडून राहिल्या या यंत्राचा कसा फायदेशीर वापर करता येईल असा विचार करत असतांनांच त्यांनी एक प्रयोग करुन पाहिला आणि तो यशस्वी झाला.

गुजरातहून आणलेली ही यंत्राची पेटी वखारीवर बसवून त्यांनी मका आणि कपाशीला यशस्वीपणे खत दिलं.या यंत्रामुळे अवघ्या दोन तासात एक एकरावर कपाशीला खत देण शक्य होत तसेच साधारण १०० किलो खताची बचत झाल्याचाही त्यांनी दावा केलाय. या यंत्राच्या जोडणीसाठी त्यांनी एकूण ६ हजार आठशे रुपये खर्च आलाय.

खतांचे वाढते दर मजूरांची टंचाई आणि वातावरणातील अनियमतपणामुळे शेतक-यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. वाढता उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर शेतक-यांनी शेतीचे प्रयोग अभ्यासून आत्मसात करायला हवे.

First Published: Friday, August 17, 2012, 11:33


comments powered by Disqus