बापानेच तोडली दारूड्या मुलाच्या हाताची बोटं, father cut his drunken son's finger

बापानेच तोडली दारूड्या मुलाच्या हाताची बोटं

बापानेच तोडली दारूड्या मुलाच्या हाताची बोटं
www.24taas.com, जळगाव

दारूमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाल्याचे आपण पाहिले आहे. मात्र आता दारूमुळे स्वत:च्याच हाताची सगळी बोटं गमवण्याची वेळ जळगावातील एका युवकावर आली आहे, दारुड्या मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून पित्यानं मुलाच्या दोन्ही हातांची बोटं छाटल्याची घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे.

धरणगाव तालुक्यातील वमगाव इथं शेताची राखण करणाऱ्या गुलाब पावरा यांनी हे कृत्य केलं आहे. त्यांचा मुलगा गंगाराम पावरा दारु पिण्यासाठी सतत पैशांची मागणी करत असे. पैसे दिले नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी तो देत असे.

या त्रासाला कंटाळून गुलाब पावरा यांनी स्वताच्याच मुलाच्या हाताची बोट छाटली. कुऱ्हाडीनं त्यांच्या शरीरावर वारही केले. जखमी गंगारामवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

First Published: Friday, December 21, 2012, 12:45


comments powered by Disqus