Last Updated: Saturday, May 18, 2013, 13:40
www.24taas.com, झी मीडिया, नाशिकबहिणीशी अश्लील वर्तन केल्याच्या कारणावरून मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याचा खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय. वडील बहिणीकडे वाईट नजेरेने बघतात आणि अश्लीश वर्तन करतात त्यामुळे चिडून मुलानं वडिलांची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील कृषी अधिकारी हनुमंत मोरे यांचा खून झालाय. त्यांचा २० वर्षीय मुलगा मयूर यानं विषारी इंजेक्शन देवून आणि गळा आवळून वडिलांची हत्या केलीये. त्यानंतर मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून स्वतहून पोलिस ठाण्यात हजर झाला.
या आधीही त्याने वडिलांना मारण्याचा पर्यंत केला होता. मात्र तो असफल ठरला होता. दरम्यान नाशिकमध्ये खुनाच्या घटनांमध्ये वाढ झालीये. गेल्या १५ दिवसातला हा पाचवा खून आहे. इतर चार खून हे पूर्ववैमनस्यातून आणि टोळक्यांच्या मारहाणीतून झालेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 18, 2013, 13:34