धुळ्यात बँकेच्या सभेत हाणामारी Fighting in Bank meeting

धुळ्यात बँकेच्या सभेत हाणामारी

धुळ्यात बँकेच्या सभेत हाणामारी
www.24taas.com, झी मीडिया, धुळे

धुळ्यामध्ये जी.एस. कॉर्पोरेटिव्ह बॅँकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झाला. जिल्हा सरकारी नोकरांसाठी असलेल्या या बॅँकेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

यावेळी सत्ताधारी गटाच्या सभासदालाही मारहाण करण्यात आली. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्यानं ते अशा प्रकारचा गदारोळ करत असल्याचा आरोप बॅँकेचे संचालक चंद्रकांत देसले यांनी केलाय.

तर सत्ताधारी गटानेच सभासद नसलेल्या लोकांना प्रवेश देऊन हे नाट्य घडवून आणल्याचा आरोप विरोधक सचिन देसले यांनी केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, August 5, 2013, 18:25


comments powered by Disqus