भुजबळांनीच केलाय ओबीसींवर अन्याय- शेलार Gajanan Shelar on CHhagan Bhujbal

भुजबळांनीच केलाय ओबीसींवर अन्याय- शेलार

भुजबळांनीच केलाय ओबीसींवर अन्याय- शेलार
www.24taas.com, नाशिक

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वी ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची टीका केली होती. भुजबळांच्या या वक्तव्याचा त्यांचे एकेकाळाचे खंदे समर्थक राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष गजानन शेलारांनी चांगलाच समाचार घेतलाय. भुजबळ स्वतःच ओबीसी समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप शेलार यांनी केलाय.

माळी समाजाच्या अधिवेशनात छगन भुजबळ यांनी आपण माळी असल्यामुळे आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचं वक्तव्य करत आपल्या विरोधकांवर हल्ला चढविला होता. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना गजानन शेलार म्हणाले, “केवळ स्वतःच्या घरात सगळी पदं राहावी अशीच भुजबळांची पहिल्यापासून भूमिका राहिली आहे. मात्र माळी सामाजाव्यातिरिक्त ओबीसी समाजाच्या इतर जातींकडे भुजबळ अन्याय करत असून जातीजातीत द्वेषाची भावना निर्माण करण्याचं राजकारण भुजबळ करतायेत.”

मागील खासदारकीच्या निवडणुकीत ‘बजाव ताली हटावो माळी’ अशी घोषणा त्यांनीच काढून निवडणुकीचा फंडा म्हणून त्याचा वापर केल्याचं आरोप शेलार यांनी पत्रकार परिषदेत केला.

First Published: Wednesday, November 7, 2012, 22:44


comments powered by Disqus