Last Updated: Wednesday, September 25, 2013, 17:30
www.24taas.com, झी मीडिया, नाशिकनाशिकमध्ये बांधकाम व्यायसायिकांना सध्या फरशी चोरांची धास्ती भरलीय. सोनसाखळी चोरी, मोटार सायकल चोरीनंतर आता चोरट्यांनी बांधकाम व्यवसायिकांच्या साईटकडे मोर्चा वळवलाय. पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला रंगेहात पकडलंय.
नाशिकमध्ये मध्यरात्री पेट्रोलिंग करणा-या पोलिसांनी चोरांच्या एका टोळीला पकडलं आणि पोलीसही चक्रावले. कारण ही टोळी चोरी करण्यासाठी चक्क इनोव्हासारख्या महागड्या कारमधून फिरायची. ही टोळी इमारतींचं बांधकाम सुरु असलेल्या साईटवर रात्री जाऊन महागड्या टाईल्स आणि फरशा चोरायची. आणि दुसरीकडे त्यांची विक्री करायची....
एकंदरीतच बांधकाम साईटवरच्या चोरीच्या या वाढत्या घटना पाहता पोलिसांनी रात्री पेट्रोलिंग वाढवावं, अशी मागणी होतेय. या टोळीकडून आतापर्यंत तीन गुन्ह्यांची उकल झालीय त्यांच्याकडून दहा लाखांचा मुद्देमाल, इनोव्हासह आणखी एक कार जप्त करण्यात आलीय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, September 25, 2013, 17:29