Last Updated: Thursday, December 27, 2012, 16:05
www.24taas.com, नाशिकनाशिकमध्ये सुरगाणा तालुक्यातल्या पळसाणा आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. १२वी सायन्सच्या या विद्यार्थिनीचे रविवारी अपहरण करण्यात आले..
त्यानंतर तिच्यावर जंगलात नेऊन बलात्कार करण्यात आला.. घटनेनंतर आत्महत्या करण्यास गेलेल्या या पिडीत मुलीला या नराधमांनी हॉस्टेलजवळ आणून सोडलं.. मात्र हॉस्टेलच्या मुख्याध्यापकाने या पीडित मुलीला आत येण्यास मज्जाव केला.
या प्रकरणी मुलीनं सुरगाणा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.. त्यानंतर चार जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळं नाशिकसह राज्यातल्या आश्रमशाळांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
First Published: Thursday, December 27, 2012, 12:38