अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार, Gang rape on minor girl

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

www.24taas.com,नाशिक

नाशिकमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना घडलीय. खासगी क्लासमधून परतत असताना या मुलीला तीन नराधमांनी कारमध्ये कोंबून चालत्या कारमध्ये बलात्कार केला.

गुरूवारी रात्री ही घटना घडली असून अज्ञात आरोपींविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यानंतर या परिसरातील संशयितांची चौकशीही करण्यात आलीय. मात्र पोलिसांच्या हाती जूनही ठोस पुरावे लागलेले नाहीत.

१४ वर्षीय नववीत शिकणाऱ्या या मुलीला तीन जणांनी चेतनानगर येथून बळजबरीने कारमध्ये कोंबले, आणि चालत्या गाडीत तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर जेथून तिला घेण्यात आले होते, त्याचठिकाणी तिला उतरविण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

संबधित मुलीने त्याबाबतची माहिती गुरुवारी आपल्या लहान बहिणीला दिली. तिने ही बाब आपल्या पालकांच्या कानावर घातली. तिच्या पालकांनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी करून गुरुवारी रात्री उशिरा तीन अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, पोलिसांनी संबंधित मुलीच्या शाळेत जाऊन या प्रकरणाबाबत माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. नाशिकचे पोलीस आयुक्त कुलवंत कुमार आणि उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी मुलीच्या पालकांची भेट घेतली. या प्रकरणी जलदगतीने तपास करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

First Published: Friday, August 24, 2012, 15:37


comments powered by Disqus